Showing posts with label तात्पर्य कथा. Show all posts

पोट भरलेले आणि भुकेकंगाल

Friday, 2 March 2012

story

ND
एकदा एका भरपूर लाच खाऊन गब्बर झालेल्या श्रीमंत अधिकार्‍याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती आणि त्या विषयीचा खटला न्यायालयात चालू होता. त्यासाठी घेतलेल्या खास सभेकरिता इसापला बोलावण्यात आले होते. या विषयावर बोलण्याकरिता इसाप उभा राहिला आणि म्हणाला :

''मी तुम्हाला एक गोष्टच सांगतो. ती ऐका आणि मग तुम्हाला जो काही न्याय द्यायचा तो द्या. ''
इसापने आपल्या गोष्टीला प्रारंभ केला. एकदा एक चिखलाने भरलेल्या नदीतून जात असता एक कोल्ह्याच्या अंगाला अनेक जळवा चिकटल्या व त्या त्याच्या रक्तावर तुटून पडल्या. जळवांचे रक्तशोषण स्थिती समोरून येणार्‍या एका साळूने पाहिली. ती म्हणाली,
''कोल्होबा, या जळवांच्या चावण्याने तू अगदीच बेचैन झाला आहेस. उपटून काढू का तु्‍झ्या अंगावरच्या जळवा? आत्ता काढून टाकते भराभर. बोल'' कोल्हा विव्हळत म्हणाला,

''नको ग बाई नको! अंग, आता या माझ्या अंगावरच्या जळवा माझं रक्त पिऊन तट्ट फुगलेल्या आहेत. आता त्या अधिक रक्त पिऊच शकणार नाहीत. पण तू त्यांना उपटून काढलंस ना, तर दुसर्‍या भुकेनं वखवखलेल्या जळवा माझ्या अंगाला चिकटतील आणि माझं सगळंच रक्त पिऊन टाकतील.

मित्रांनो, ऐकलीत ना माझी गोष्ट. या जळवांप्रमाणे हा माणूस आता अधिक पैसा खाणार नाही, परंतु त्याच्या जागी तुम्ही दुसरा नेमाल तर तो मात्र पैसा खाण्याच्या नव्या वाटा शोधून काढून अधिक शोषण करील. तेव्हा मुळातच लाच खाण्याचे सर्व मार्ग कसे बंद करता येतील ते पहा. केवळ व्यक्ती बदलून लाचलुचपत थांबणार नाही. शोषण कमी होणार नाही. उलट ते अधिक वेगाने होत राहील. ''
source
Continue Reading | comments

इमानदारी हीच खरी कसोटी (रघुनाथ गोसावी)

story

ND
एक छोटं गांव, त्या गांवात गरीब कुटुंब राहत होतं. मुलाचे आई वडील काबाड कष्ट करती असत. पण त्यांचा एकुलता एक दिनू नावाचा मुलगा, तो बिचारा छोटी छोटी कामे करून शिकत असे. काम करून तो दमून जात असे. तो अभ्यास करून, आपला नंबर खाली जाता काम नये असा सतत झटत असे.

त्याचप्रमाणे तो आपल्या वर्गशिक्षिकाच्या घरची छोटी छोटी कामे करत असे. त्यामुळे शिक्षकांना त्याच्या बद्दल नेहमी सहानुभूती वाटत असे. त्याला ते वह्या, पुस्तके देत असत. दिनूची हुशारी पाहून शिक्षक त्याला म्हणाले, ''अरे दिनू तू एवढा अभ्यास करतोस मग तू स्कॉलरशिप परीक्षेला का बसत नाहीस? तू परीक्षा दिलीस तर नक्की त्या परीक्षेत पास होशील. तुला स्कॉलरशिपही मिळेल'' पण परिस्थितीमुळे दिनू गप्पच बसला. त्यावर तो विचार सतत करू लागला की आपण छोटी छोटी कामे करतो त्यामुळे आपणाला कसे बसे मिळते. त्यानीच आपले पोट कसे बसे भरत. मग स्कॉलरशिपची फी कशी भरणार?

teacher

ND
आता फी भरण्यास थोडे दिवस राहिले. दिनू सारखा विचार करू लागला. असे होतात तोच शिक्षक म्हणाले, ''आता फी भरण्यास फक्त एक दिवसच राहिला आहे.'' दिनू म्हणाला, ''गुरुजी मी फी उद्या नक्की भरतो.'' गुरुजी म्हणाले ठीक आहे. उद्या फी भर पण जाताना हे पुस्तक घेऊन जा.'' असे आवर्जून गुरुजीने सांगितले. ''ते पुस्तक तू वाच.'' दिनूने घाई घाईने ते पुस्तक घेतले व घरी गेला. वेळ न दवडता ताबडतोब त्याने ते पुस्तक उघडले तो काय? त्या पुस्तकात चमत्कार त्याला दिसला. त्या पुस्तकात चक्क 500 रुपयांची कोरी नोट त्याला दिसली. त्याला आश्चर्य वाटले. अरे पण मी तर पुस्तकात 500 रुपयांची नोट ठेवलेली नव्हती. मग कोठून आली ही नोट! तो विचार करू लागला. त्याच्या लक्षात आले की, ही नोट नक्की गुरुजींची आहे. ती नोट मी कशी घेणार? ते पैसे गुरुजींचे आहेत. पैसे गुरुजींना परत नेऊन दिले पाहिजेत. असे म्हणून तो ताबडतोब ती नोट घेऊन गुरुजींच्या घराचा रस्ता गाठला. पण त्याच्या मनात आले की, या पेश्याने स्कॉलरशिपची फी भरता येईल. कपडे, पुस्तके, आपल्या आई वडिलांना कपडे घेता येतील. हे आपणांस फारच उपयोगी आहेत. पण, 'हे पैसे आपले नाहीत.' तो धावत धावत गुरुजींच्या घरी पोहोचला.

गुरुजी आराम खुर्चीत बसून वाचत होते. तो तेथे दिनू पोहोचला. दिनू म्हणाला, ''गुरुजी आपण जे पुस्तक मला वाचायला दिले होते. त्या पुस्तकात 500 रुपयाची नोट होती. ती आपली नोट आहे. ही घ्या.'' गुरुजी म्हणाले, ''धन्यवाद दिनू.'' एखाद्याने हे पैसे आपल्या जवळ ठेवेले असते. तुझी अशी परिस्थिती त्यात तु फीचा अजिबात विचार केला नाहीस. तू ताबडतोब 500ची नोट माझ्याकडे घेऊन आलास. खरोखर तू प्रामाणिक इमानदार सच्चा मुलगा आहेस. हे आज मला कळले''. शाब्बास! दिनू तुझी परीक्षा घ्यावी म्हणून मी 500 रुपयाची नोट पुस्तकात ठेवली होती. त्या परीक्षेत तु उत्तीर्ण झालास. 'धन्य तु दिनू''. असे आनंदाने उद्गगार गुरुजींनी काढले. कोणती परीक्षा गुरुजीँ '' दिनू म्हणाला. ''सत्त्वपरीक्षेत तू उत्तीर्ण झालास. ''असे म्हणून गुरुजींनी दिनूला इनाम दिले.'' हे काय गुरुजी, हे काय करता, मला इनाम कशामुळे. तू शिक. चांगला शहाणा हो. परीक्षा देत राहा. तुला ही पुस्तके, वह्या नवे कपडे व परीक्षेची फी भरल्याची ही पावती.

हे पाहून दिनूला चांगले बक्षीस मिळाले. तो जोरात अभ्यास करू लागला. अन शेवटी स्कॉलरशिप परीक्षेत सर्व केंद्रात पहिला आला. त्यामुळे दिनूच्या सर्व हाल अपेष्टा संपल्या. सर्व समस्या त्याच्या प्रामाणिकपणाने वागल्यामुळे आपोआप सुटल्या. भाग्यवान दिनू. जो नेहमी सत्याने वागतो, प्रामाणिकपणाने वागतो त्याला चांगली किंमत नेहमी मिळते. 'सत्याची कास धरा. सत्य कधीही लपत नसते.'

Sport

Entertainment

World News

Powered by Blogger.
 
Support : Creating Website | Johny Template | Maskolis | Johny Portal | Johny Magazine | Johny News | Johny Demosite
Copyright © 2011. Marathi Zendaa - All Rights Reserved
Template Modify by Creating Website Inspired Wordpress Hack
Proudly powered by Blogger