Home » » राजकीय पक्ष गेलेत तरी कुठे?

राजकीय पक्ष गेलेत तरी कुठे?

मुंबई येथे लोकल ट्रेनच्या सिग्नल नियंत्रण कक्षात लागलेल्या आगीमुळे मुंबई लोकलची संपूर्ण सिग्नल यंत्रणा मोठ्याप्रमाणात खराब झाली व त्यामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाली. त्याचा परिणाम लाखो मुंबईकरांवर झाला.
लोकल ट्रेन हि मुंबईची लाईफ लाईन आहे. पण कालच्या घटनेने हि  लाईफ लाईनविस्कळीत झाली व मुंबईकरांचे हाल झालेत. मुंबईतील रस्त्यांवर आधीच असलेला वाहतुकीचा ताण व त्यात बंद पडलेली रेल्वे यामुळे मुंबई थांबते कि काय अशी शंका निर्माण झाली.
अशा वेळी मनात एक विचार आला कि एवढी मोठी समस्या निर्माण झाली पण स्वतःला गरिबांची, आम जनतेची म्हणून घेणारे राजकीय पक्ष मात्र कुठे दिसलेत नाहीत. मुंबईकरांना पर्यायी वाहतुकीची व्यवस्था करण्यास एखाद्या पक्षाने काही केले असे ऐकिवात नाही. रेल्वे सेवा विस्कळीत होऊन आता २ दिवस झालेत पण मुंबईतील एकही नावाजलेला राजकीय नेता या विषयी एक शब्दही बोलला नाही किई आपल्या कार्यकर्त्यांना कोण्याही सूचना केल्या नाहीत. मुंबईकरांची समस्या सोडविण्यासाठी कोणताही ठोस असा कार्यक्रम या पक्षांनी हातही घेतला असे दिसून येत नाही आहे.
आपल्या सभेला ट्रक च्या ट्रक भरून आणणारे राजकीय पक्षांकडे आज mumbaiकरांसाठी आज एक साधी रिक्षा पण नाही? खरी गरज असताना राजकीय पक्ष जनतेपासून दूर राहतात व निवडणूक आली कि रस्त्यावर उतरतात हे या घटनेने पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. या प्रसंगातून धडा घेऊन या पुढे मुबैकारांनी स्वतःची व्यवस्था स्वतः करायला हवी.
Share this article :

0 comments:

Post a Comment

 
Support : Creating Website | Johny Template | Maskolis | Johny Portal | Johny Magazine | Johny News | Johny Demosite
Copyright © 2011. Marathi Zendaa - All Rights Reserved
Template Modify by Creating Website Inspired Wordpress Hack
Proudly powered by Blogger